6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन लाँच

तुम्ही जर नवीन बजेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला भारतीय कंपनीचा फोन हवा असल्यास लावाने तुमच्यासाठी खास स्मार्टफोन लाँच केला आहे. लावाने भारतात ‘लावा झेड61 प्रो’ स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत देखील खूप कमी आहे. यात 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

लावा झेड61 प्रो ची भारतीय बाजारात किंमत 5,774 रुपये आहे. यात 2 जीबी रॅम + 16 जी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबी पर्यंत वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे आणि यात 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल.

Image Credited – HT

कॅमेरा फीचर्सबद्दल सांगायचे तर रियर पॅनेलवर एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा सेंसर देण्यात आलेला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्यात बोकेह मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा आणि फिल्टर्स देण्यात आलेले आहेत.

Image Credited – fonearena

फोनमध्ये 3,100 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, यासोबत मायक्रो यूएसबी पोर्ट चार्जिंग कनेक्टिव्हिटीसाठी मिळते. हा फोन मिडनाइट ब्लू आणि एंबर रेड रंगात मिळेल. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन व्यतिरिक्त पुढील एका आठवड्यात ऑफलाईन स्टोर्समध्ये देखील हा फोन उपलब्ध असेल.

Leave a Comment