कोरोना ‘सुपर-स्प्रेडर्स’ ठरलेल्या या गावात तैनात करण्यात आले कमांडो

केरळच्या एका गावात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढल्याने या गावाला रिकामे करून येथे 25 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. या गावात अनेक सुपर स्प्रेडर्स आहे. म्हणजेच अशी कोरोनाग्रस्त व्यक्ती जिने 6 पेक्षा अधिक जणांना संक्रमित केले आहे . आरोग्य तज्ञांनुसार तिरुवनंतपुरमच्या पुंतुरा गावात टेस्टिंग केल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. हे केरळचे पहिले व्हायरस क्लस्टर देखील असू शकते.

सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात दिसत आहे की पुतुंरा गावात कमांडो, रुग्णवाहिका आणि पोलिसांची गाडी फिरत आहे. याशिवाय लाउडस्पीकरवर घोषणा दिली जात आहे की एखादी व्यक्ती गरज नसताना बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना कमांडोजच्या मदतीने रुग्णवाहिकेत भरून क्वारंटाईन सेंटरवर नेले जाईल.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, जिल्ह्याच्या कोव्हिड-19 कंटेनमेंट इंचार्ज अधिकाऱ्याने सांगितले की, चाचणीनंतर सर्वात प्रथम पॉजिटिव्ह आलेल्यांमध्ये एक मासे व्यापारी आहे. तो अनेकदा तामिळनाडूला जात असे व तेथील कुमारीचंदाच्या स्थानिक बाजारात मासे विकत असे. जे लोक पॉजिटिव्ह आढळले आहेत, त्यांचा या बाजाराशी काहीना काही संबंध आहे. ते सर्व पुंतुराचे निवासी आहेत.

येथील 600 लोकांची चाचणी करण्यात आली असून, त्यातील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संसर्ग झालेल्या मच्छिमाराच्या संपर्कात आलेल्या 120 लोकांना ट्रेस करण्यात आले आहे. या गावात प्रवेशास आता मनाई करण्यात आली आहे. तीन वॉर्डातील गावात प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ दिले जात आहे.

Leave a Comment