चिनी मोबाईल कंपनीशी असलेले नाते कार्तिक आर्यनने तोडले !


आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता कार्तिक आर्यनने अल्पवधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यातच या अभिनेत्याने सर्वांना अभिमान वाटवा अशी एक गोष्ट केली आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. चिनी मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या ओप्पो (OPPO)चा कार्तिक आर्यन ब्रँड अॅम्बेसेडर आहे. पण भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीत त्याने ओप्पोशी असलेले आपले नाते संपुष्टात आणले आहे.

दरम्यान याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन कार्तिकने या गोष्टीचे संकेत दिले आहे. त्याचबरोबर या गोष्टीला ट्रेडच्या तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे, तसेच कार्तिक चायनीज ब्रँडशी नाते तोडणार बॉलिवूडमधील पहिला सेलिब्रेटी बनला आहे.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटरवर कार्तिकने एका फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिकच्या हातात आयफोन दिसत आहे. तो खिडकीत बसून आकाशाचे फोटो काढताना दिसत आहे. यानंतर मीडियासह त्याच्या चाहत्यांनीही कार्तिकने चायनीज मोबाईल ब्रँडची जाहिरात बंद केल्याचा अंदाज वर्तवला आहे.

एखाद्या ब्रँडचा जेव्हा एखादा सेलिब्रिटी ब्रँड अॅम्बेसेडर असतो, तेव्हा तो सोशल मीडियावर त्या कराराअंतर्गत इतर कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू शकत नाही. जर कोणी असे केले तर तो कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की कार्तिककडून प्रेरणा घेऊन बॉलिवूडमधील इतर सेलिब्रेटीही देशहितासाठी हे पाऊल उचलतील.

Leave a Comment