कोव्हिड विशेष रेल्वेमधून 40 लाखांची सिगरेट जप्त

जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर एका कोव्हिड विशेष रेल्वेत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 4.5 लाख बेकायदेशीर सिगरेट जप्त केल्या आहेत. या सिगरेट्सची किंमत जवळपास 40 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, जवळपास 40 लाख रुपये किंमतीच्या पॅरिस ब्रँडच्या सिगरेट 15 डब्ब्यांमध्ये पॅक करण्यात आल्या होत्या. बांगलादेशमधून तस्करी करून या सिगरेट आणण्यात आल्याचा संशय आहे.

अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या सिगरेटच्या डब्ब्यांना रेल्वेमधील एका माल डब्ब्यामधून जप्त करण्यात आले. ही कोव्हिड विशेष रेल्वे लॉकडाऊनमध्ये अमृतसरच्या मार्गाने हावडा ते दिल्ली या मार्गावर धावते. त्यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये बनलेल्या या सिगरेटची तस्करी करून भारत-बांगलादेश सीमेवर हावडाद्वारे देशात आणले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment