कोरोनाग्रस्तांच्या मेंदूवर होत आहे धोकादायक परिणाम, अभ्यासात दावा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हा व्हायरस केवळ रुग्णाच्या फुफ्फूसावरच नाही तर मेंदूवर देखील वाईट परिणाम करत असल्याचे आता अभ्यासात समोर आले आहे. लंडनच्या वैज्ञानिकांनुसार कोरोनामुळे मेंदू कमी काम करण्यास सुरूवात करतो. याचा नर्व्हस सिस्टमवर परिणाम होतो. मेंदूच्या नसांवर सूज येते. संसर्ग झालेली व्यक्ती कोणत्याही गोष्टींचा विचार करू लागते.

यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी 43 कोरोना रुग्णांच्या मेंदूची तपासणी केली. त्यांना आढळले की, रुग्णांच्या मेंदूंच्या नसांना सूज येत आहे. मनोविकृति आणि रुग्ण विनाकारण बडबड करत आहे. यूसीएल इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजची माइकल जँडी आणि या अभ्यासाच्या सहाय्यक लेखकाने सांगितले की, मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा परिणाम पाहिल्यास आढळेल की 1920-30 मध्ये पसरलेल्या इंफ्लूएंजा फ्लू प्रमाणेच याचा रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होत आहे.

Image Credited – Aajtak

कॅनडाच्या वेस्टर्न यूनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट अँड्रियन ओव्हेन यांनी सांगितले की, एका वर्षात 1 कोटी लोक या आजारातून बरे झाल्यास, त्यांच्या शरीरात अनेक आजार घर करतील. यात मेंदूची समस्या देखील प्रमुख असेल. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होईल. मेंदूवर सूज येणे दुर्मिळ आहे. याला एक्यूट डिसेमिनेटेड इंसिफेलोमाइलिटिस म्हणतात. लहान मुले आणि युवकांमध्ये हे अधिक पाहण्यास मिळत आहे.

Image Credited – Aajtak

ओव्हेन यांच्यानुसार, मेंदूवरील हा परिणाम थोडेच दिवस राहील असे वाटत असल्यास हे चुकीचे ठरेल. आपल्या अद्याप माहिती नाही की हा वाईट परिणाम किती वर्ष राहील. हा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या मेंदूची तपासणी करावी, त्यामुळे नक्की काय परिणाम होत आहे याची माहिती मिळेल.

Leave a Comment