गँगस्टर विकास दुबेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे पोलिसांवर हल्ला करून 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक करण्यात आले आहे. विकास दुबे उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन करण्यासाठी आला होता. त्यावेळी तेथील गार्डने त्याला ओळखले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला तेथेच पकडले. उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी याची पुष्टी केली आहे.

कानपूरमध्ये चकमकीत 8 पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला विकास दुबे आधी दिल्ली-एनसीआरला पोहचला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानंतर तो पुन्हा मध्यप्रदेशच्या उज्जैन येथे पोहचला. यावेळी मध्य प्रदेशच्या पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान पोलिसांनी विकास दुबेच्या दोन साथीदारांचा कानपूर आणि इटावा येथे इनकाउंटरमध्ये खात्मा केला. उज्जैन पोलीस आता विकास दुबेची चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर ट्राजिंट रिमांडची कारवाई केली जाईल.

Leave a Comment