कॉलेजच्या अ‍ॅडमिशनसाठी ट्रम्प यांनी केला होता झोल, पुतणीच्या पुस्तकात दावा

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपदी पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाजगी आयुष्याबाबत आता अनेक रहस्य समोर येऊ लागली आहेत. ट्रम्प यांची पुतणी मॅरी ट्रम्प यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की ट्रम्प यांनी कॉलेजच्या अ‍ॅडमिशनसाठी झोल केला होता. त्यांनी पैसे देऊन दुसऱ्या व्यक्तीला आपल्या जागी परीक्षा देण्यासाठी पाठवले होते. ट्रम्प त्यावेळी हायस्कूलमध्ये शिकत होते व कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी त्यांना चांगल्या गुणांची आवश्यकता होती.

मॅरी यांचे  ‘टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकात हा दावा करण्यात आलेला आहे. हे पुस्तक 25 जुलैला प्रकाशित होणार आहे. प्रकाशित होण्याच्या आधीच मागणीमुळे हे पुस्तक बेस्ट सेलर ठरल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे.

या पुस्तकात मॅरी यांनी आणखी एक दावा केला आहे. मॅरी यांच्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील फ्रेडी ट्रम्प सीनियर त्यांचा छळ करत असे. त्यांना प्रेमाचा अर्थ माहीत नव्हता. केवळ आज्ञाचे पालन करावे असे त्यांचे मत होते व डोनाल्ड ट्रम्प यांना सांगेल ते करावे लागत असे.

Leave a Comment