गलवाण खोऱ्यातून चिनी सैन्याची माघार, गोगरा आणि हॉट स्प्रिंगमध्ये प्रक्रिया सुरू


नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या 23 दिवसांनंतर येथे परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर वर आली असून सैन्याने बुधवारी सांगितले की, दोन्ही देशांच्या सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट- 15 व्या स्थानावरुन माघार घेतली आहे. चीनची सेना सुमारे दोन किमी मागे गेली आहे. दुसरीकडे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागात सैन्याने माघार घेतली असून ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.

चीनने या ठिकाणी रविवारीपासून आपली संरचना पाडून टाकण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या कराराच्या अनुषंगाने दोन्ही सैन्य चकमक झालेल्या ठिकाणापासून दीड ते दोन किलोमीटर मागे हटतील. गलवाण संघर्षानंतर दोन्ही देशांमधील सैन्य अधिकार्‍यांमधील अनेक पातळींवरील चर्चा झाल्या. पणएकमत झाले नाही. यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची व्हिडिओ कॉलवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्याशी दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर काही तासांनंतर चीनने सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment