टाटाच्या या कार्सवर मिळत आहे हजारो रुपयांचा डिस्काउंट

कार विक्री मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये चांगली होती. कंपन्या देखील विक्री वाढविण्यासाठी ग्राहकांना खास ऑफर देत आहेत. तुम्ही जर टाटाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ आहे. टाटा मोटर्स जुलै महिन्यात आपल्या कार्सवर हजारो रुपये सूट देत आहे. कोणत्या कारवर किती सूट आहे, जाणून घेऊया.

Image Credited – navbharattimes

टाटा टियागो – 

टाटा मोटर्सच्या या एंट्री लेव्हल कारवर 25 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. यात 15 हजार रुपये कंझ्यूमर स्कीम आणि 10 हजार रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. याशिवाय कंपनी टियागोवर 10 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर देत आहे. या कारची किंमत 4.60 लाख रुपये असून, 4,999 रुपयांच्या सुरुवाती ईएमआयवर तुम्ही कार खरेदी करू शकता.

Image Credited – navbharattimes

टाटा टिगोर –

टाटाच्या या सब-कॉम्पॅक्ट सिडॅनवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 20 हजार रुपये कंझ्यूमर स्कीम आणि 20 हजार रुपये ऐक्सचेंज बोनसचा समावेश आहे. याशिवाय यावर 10 हजारापर्यंत कॉर्पोरेट ऑफर मिळेल. टिगोरची सुरूवाती किंमत 5.75 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

टाटा हॅरियर –

टाटा आपल्या या शानदार एसयूव्हीवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यात 25 हजार रुपये कंझ्यूमर स्कीम आणि 40 हजार रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. ही ऑफर हॅरियरच्या डार्क एडिशन, झेडएक्स+ आणि एक्सझेडए+ व्हेरिएंट्स सोडून आहे. या व्हेरिएंट्सवर देखील ऐक्सचेंज बोनस स्वरूपात 40 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. कंपनी हॅरियरवर 15 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. हॅरियरची सुरूवाती किंमत 13.69 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

टाटा नेक्सॉन –

टाटाच्या या लोकप्रिय एसयूव्हीवर केवळ 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉजवर या महिन्यात काहीही ऑफर नाही. टाटा नेक्सॉनची किंमत 6.95 लाख रुपयांपासून सुरू आहे.

टाटाच्या कार्सवर मिळणारी ही ऑफर शहर, डीलरशिप, कार्सचे व्हेरिएंट आणि रंगानुसार वेगवेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळील कंपनीच्या डीलरशिपला संपर्क करू शकता.

Leave a Comment