सचिन शोएब अख्तरला घाबरत असे, आफ्रिदीचा हास्यास्पद दावा

पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरबाबत विवादास्पद वक्तव्य केले आहे. आफ्रिदीने 9 वर्षांपुर्वी म्हटले होते की सचिन पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा सामना करताना घाबरत असे. आता पुन्हा एकदा याच विवादास्पद वक्तव्याची पुनरावृत्ती केली आहे. आफ्रिदीने म्हटले की, सचिन ही गोष्ट मान्य करणार नाही, परंतु तो अख्तरला घाबरत असे. मात्र असे काहीही नसल्याचे शोएब अख्तरने म्हटले होते.

आफ्रिदीने आपल्या पुस्तकात म्हटले होते की, सचिन शोएबला घाबरत असे. मी स्वतः पाहिले आहे. मी स्क्वेअर लेगला उभा राहत असे. जेव्हा अख्तर गोलंदाजी करण्यास येत असे तेव्हा सचिनचे पाय थरथरत असे. आता पुन्हा एकदा जैनब अब्बाससोबतच्या युट्यूब व्हिडीओमध्ये हा दावा केला आहे. आफ्रिदीने म्हटले की, सचिन तेंडुलकर स्वतः तर तोंडाने सांगणार नाही की मला भिती वाटत आहे. शोएब अख्तरचे असे अनेक स्पेल्स असायचे की, केवळ सचिनच नाहीतर जगातील अनेक श्रेष्ठ फलंदाज घाबरायचे.

आफ्रिदीने हे देखील म्हटले की, सचिन मिस्ट्री बॉलर सईद अजमलला देखील घाबरत असे. 2011 च्या वर्ल्डकपवेळी सचिन सईद अजमलला घाबरताना दिसत असे. ही काही मोठी गोष्ट नाही. खेळाडू अनेकदा दबावात येतात आणि हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते.

Leave a Comment