“… तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच आर्थिक त्सुनामी येणार असल्याचा इशारा दिला होता, याचा उल्लेख करत भाजप आणि माध्यमांद्वारे खिल्ली उडवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, लघु आणि मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठ्या कंपन्या आर्थिक गंभीर स्थितीमध्ये आहेत. बँका संकटात आहेत. मी महिन्याभरापुर्वीच म्हटले होते की आर्थिक त्सुमानी येत आहे आणि देशाला या सत्याबाबत इशारा दिल्यानंतर भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती.

चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापुर्वीच राहुल गांधींनी दावा केला होता की, सरकारची आर्थिक गैरव्यवस्था कोट्यवधी कुटुंबे उद्ध्वस्त करणार आहे व ही बाब  स्विकारली देखील जाणार नाही. राहुल गांधी यांनी लिहिले होते की, भारताची आर्थिक गैरव्यवस्था एक समस्या असून, जी लाखो कुटुंबाना उद्धवस्त करेल. आता शांत बसून याचा स्विकार केला जाणार नाही.

Leave a Comment