पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा; साधला सुशांतच्या आत्म्याशी संवाद !


मागील महिन्याच्या 14 तारखेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली गेली. सध्या त्याच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. पण त्याने आत्महत्या नैराश्येमुळे केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर अद्यापही पोलिस ठोस अशा कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत. अशात सुशांतचे चाहते त्याने आत्महत्या का केली यामागील कारण शोधत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आहेत. यापैकीच एक म्हणजे पॅरानॉर्मल रिसर्च.

सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूसंदर्भात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा या व्हिडीओत केला जात आहे. कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तिने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत सुशांतच्या मृत्यूसंदर्भात चर्चा केली. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत संवाद साधला. त्यावेळी आपली हत्या झाल्याचे सुशांतने स्वत: सांगितल्याचा दावा या व्हिडीओतील एक्स्पर्ट करत आहेत. एक्स्पर्ट म्हणतात, सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. पण सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, एवढेच आम्ही सांगू शकतो.

लवकरच जगासमोर सुशांतच्या हत्येचे सत्य आणून आम्ही सुशांत व त्याच्या चाहत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आता या एक्सपर्टने केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, याची माझापेपर पुष्टी करत नाही. पण सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत, हेच या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.

Leave a Comment