पाकिस्तानचा दावा, फेरविचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जाधव यांनी दया याचिकेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी जाधव यांना दुसरे काउंसिलर एक्सेस देण्याची देखील ऑफर दिली आहे. या आधी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांना दिलासा मिळाला आहे.

पाकिस्तानने दुसऱ्यांदा कुलभूषण जाधव प्रकरणात काउंसिलर एक्सेस देण्याचा प्रस्ताव भारताला पाठवला आहे. याशिवाय जाधव यांचे वडील आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. न्यूज18 च्या वृत्तानुसार जाधव यांना 17 जूनला फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी नकार दिला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी या बाबत भारतीय उच्चायोगाला लिखित सूचना दिली आहे.

जाधन यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

Leave a Comment