झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन होम क्वारंटाईन

झारखंड सरकारचे पेयजल आणि स्वच्छता मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. आमदार मथुरा महतो आणि मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या भेटीनंतर सोरेन यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर प्रवेशास देखील मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे.

सोरेन यांच्या व्यतिरिक्त त्यांचे प्रेस सल्लागार, सचिव, मुख्य सचिव यांना देखील होम क्वारंटाईनमध्ये जाण्याची सुचना देण्यात आलेली आहे. राज्याचे पेयजल आणि स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकरू यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. राज्याच्या कॅबिनेटमधील कोरोना संसर्गाचे हे पहिलेच प्रकरण आहे.

दरम्यान, झारखंडमधील कोरोनाग्रस्तांचा आकडेवारीत वाढ होत असून, आतापर्यंत हा आकडा 3 हजारांच्या पुढे गेला आहे.

Leave a Comment