टीक-टॉकला पर्याय म्हणून इंस्टाग्रामने भारतात लाँच केले ‘रील्स’

केंद्र सरकारने 59 चीनी अ‍ॅपसोबत लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर काही दिवसांपुर्वी बंदी घातली आहे. टीक-टॉकला पर्याय म्हणून अनेक भारतीय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप प्ले स्टोरवर उपलब्ध झाले आहेत. मात्र आता फेसबुकच्या मालकीच्या इंस्टाग्रामने भारतात रील्स (Reels) लाँच केले आहे. इंस्टाग्रामच्या या फीचरमध्ये टीक-टॉकप्रमाणेच अनेक गोष्टी मिळतील. टीक-टॉकवर भारतात बंदी असल्याने इंस्टाग्रामचे हे फीचर युजर्सला आवडू शकते.

यासाठी युजर्सला कोणतेही नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. युजर्सला इंस्टाग्रामच्या आतच हे फीचर मिळेल. हे फीचर आधीपासूनच अनेक देशात उपलब्ध होते, आता भारतीय युजर्ससाठी हे फीचर रोलआउट करण्यात आले आहे.

इंस्टाग्राम रील्स फीचरद्वारे युजर टीक-टॉकप्रमाणेच 15 सेंकदांचा व्हिडीओ बनवू शकतात. व्हिडीओतील बॅकग्राउंड बदलू शकतात. व्हिडीओ स्पीड कंट्रोल करू शकतात. यात टीक-टॉकप्रमाणे ड्यूट फीचर देखील मिळेल. व्हिडीओ बनवल्यानंतर युजर इंस्टाग्राम स्टोरीज अथवा मित्रांना शेअर करू शकतात.

Leave a Comment