कोरोना संकटात काम केल्याचे ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे ‘गिफ्ट’


मुंबई – कोरोनाच्या देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत त्याचबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत. त्यातच देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI) आपल्या कर्मचाऱ्यांना खुषखबर दिली आहे.

आपल्या ८० हजार ‘फ्रंटलाइन’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय आयसीआयसीआय बँकेने घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या ८० हजार कर्मचाऱ्यांना कोरोना संकटकाळात काम केल्याचे गिफ्ट देण्यात आले आहे. ८ टक्क्यांची वाढ त्यांच्या पगारात करण्यात आली आहे.

एम1 आणि त्याखालील श्रेणीतील पगारात वाढ झालेले सर्व कर्मचारी आहेत. यातील बहुतांश फ्रंटलाइन कर्मचारी आहेत, ज्यांचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. सुत्रांच्या माहितीनुसार ही पगारवाढ आर्थिक वर्ष 2020-21 साठी करण्यात आली असून जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होईल.

Leave a Comment