तुम्ही खाल्ला आहे का मास्क पराठा ?


चेन्नई : आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या पराठ्यांचा आस्वाद घेतला असेल, पण तुम्ही कधी मास्क पराठ्याचा आस्वाद घेतला आहे का ? नाही ना… पण या कोरोनाच्या काळात तुमच्या ताटात मास्क पराठा दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण तामिळनाडूतील मदुराई रेस्टॉरंटमध्ये असा मास्क पराठा उपलब्ध झाला आहे.

हा मास्क पराठा मदुराईतील टेम्पल सिंटी या प्रसिद्ध रेस्टॉरंटने तयार केला असून मास्क या कोरोना संकट काळात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि मास्कच्या वापराचे महत्व पटवून देण्यासाठी हा मास्कसारखा पराठा तयार करण्यात आला आहे. या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा असा संदेश दिला जात आहे.


यासंदर्भात माहिती देताना पराठा मास्टर एस. सथीश यांनी सांगितले, की सर्जिकल मास्कचा आकार पारंपारिक पराठ्याला दिला आहे. त्याला एका विशिष्ट पद्धतीने आम्ही फोल्ड केले आहे आणि त्याला दोन्ही बाजूंना होल्डर लावण्यात आले आहेत. या पराठ्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री सारखीच आहे. फक्त आकार बदलला आहे.

आमचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे. मदुराईतील बहुतेक लोक मास्क घालण्यास कचरत आहेत, पण हा मास्क पराठा तेथील लोकांच्या पसंतीस उतरत आहे. फक्त मोठी माणसच नाही तर लहान मुलांच्या पसंतीस उतर आहे. सध्या दोन पराठ्यांची किंमत 50 रुपये असल्याचे सथीश यांनी सांगितले.

Leave a Comment