खुशखबर…! सरकार ऑगस्टपर्यंत भरणार 15 हजार पर्यंत पगार असलेल्या कर्मचार्‍यांचा पीएफ


नवी दिल्ली – 24 टक्के प्रोव्हिंडड फंड केंद्र सरकार भरेल असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आता ऑगस्टपर्यंत या निर्णयाला मुदतवाढ मिळाली असून त्यामुळे आता कर्मचार्‍यांना ऑगस्टपर्यंत केंद्र सरकार प्रोव्हिंडड फंड भरणार असल्यामुळे याचा फायदा 72 लाख कर्मचार्‍यांना फायदा मिळणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 100 कर्मचारी ज्या कंपनीमध्ये आहेत आणि 15 हजार आणि त्यापेक्षा कमी पगार 90 टक्के कर्मचार्‍यांना असेल त्यांचा पीएफ केंद्र सरकार भरणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हा पीएफ ऑगस्टपर्यंत जमा केला जाणार आहे. केंद्र सरकार या योजनेनुसार 4 हजार 860 कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे 72 लाख हून अधिक कर्मचार्‍यांना थेट लाभ होणार आहे.

Leave a Comment