कोरोना : लस निर्मितीसाठी अमेरिका ‘या’ कंपनीला देणार तब्बल 12 हजार कोटींचा निधी

बायोटेक कंपनी नोव्हावॅक्सद्वारे तयार करण्यात आलेल्या कोव्हिड-19 वरील लसीच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी 1.6 बिलियन डॉलर (जवळपास 12 हजार कोटी रुपये) निधी देणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. ही रक्कम ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत देण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. याशिवाय अमेरिका कोव्हिड-19 वरील उपचार आणि रोगप्रतिबंधक औषधाच्या प्रयोगासाठी रेजिनरॉनला देखील 450 अमेरिकन डॉलरचा निधी देणार आहे.

अमेरिकेच्या आरोग्य विभाग, संरक्षण विभाग आणि मानवी सेवा यांच्या सोबत झालेल्या कराराच्या अटीनुसार नोव्हावॅक्स या वर्षीच्या अखेरपर्यंत लसीचे 100 मिलियन डोस देण्यास तयार झाले आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ स्टेनली एर्क म्हणाले की, आम्ही देशातील लोकसंख्येला महत्त्वपुर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी वेगाने वॅक्सीनचा कार्यक्रम पुढे नेत आहोत. ऑपरेशन वार्प स्पीडचा भाग होणे गर्वाची बाब आहे. या लसीच्या अंतिम चाचणीला  NVX-CoV2373 असे नाव देण्यात आलेले आहे. पुढील काही महिन्यात ही लस उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.

मेरीलँड येथील ही कंपनी सार्स-कोव्ह -2 च्या ‘स्पाइक प्रोटीन’चे संश्लेषित तुकडे विकसित करण्यासाठी कीटक पेशींचा वापर करते. हे व्हायरस पेशींवर आक्रमण करण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सक्रिय करते. अमेरिकेद्वारे नोव्हावॅक्सला दिलेली रक्कम ऑक्सफोर्ड विद्यापीठाला लसीसाठी देण्यात आलेल्या 1.2 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे.

Leave a Comment