चीन भविष्यातील सर्वात मोठा दीर्घकालीन धोका – एफबीआय

अमेरिकेची सुरक्षा संस्था एफबीआयचे संचालक ख्रिस्टोफर रे यांनी चीनवर आरोप करत आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षावर चीनद्वारे करण्यात येणारी हेरगिरी अमेरिकेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. एफबीआयच्या सध्याच्या 5 हजार सक्रिय काउंटर इंटेलिजेंस प्रकरणातील अर्ध्यापेक्षा अधिक चीनशी संबंधित आहेत. चीन भविष्यातील सर्वात मोठा दीर्घकालीन धोका आहे.

एका कार्यक्रमात बोलताना ख्रिस्टोफर रे म्हणाले की, अमेरिकेत सध्या जवळपास 5 हजार सक्रिय एफबीआय काउंटर इंटेलिजेंस प्रकरणातील अर्ध्यापेक्षा अधिकचा चीनशी संबंध आहे. आता तर परिस्थिती अशी झाली आहे की एफबीआय प्रत्येक दहाव्या मिनिटाला चीन संबंधी नवीन प्रकरण पाहत आहे.

ते पुढे म्हणाले की, चीन अमेरिकन आरोग्य संघटना, औषध कंपन्या आणि आवश्यक कोव्हिड-19 वर संशोधन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांशी करार करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनद्वारे काउंटर इंटेलिजेंस आणि आर्थिकरित्या त्यांचे हेरगिरी करणे अमेरिकेच्या सुचना, सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रासाठी मोठा धोका आहे. जर तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास, या गोष्टीची पुर्ण शक्यता आहे की तुमचा खाजगी डेटा चोरी करण्यात आला आहे.

Leave a Comment