चिंपाझीचा सिंहाच्या पिल्लाला दूध पाजतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

जगातील सर्वात प्रेमळ नाते कोणते आहे ? असे जर तुम्हाला विचारले तर तुमचे उत्तर नक्कीच असेल आईचे नाते. आई आपल्या बाळांवर विना स्वार्थ प्रेम करत असते. आई आहे म्हटल्यावर ती आपल्या बाळाला जीव लावणार, त्याच्यावर प्रेम करणारच. असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मादा चिंपाझी सिंहाच्या छाव्याला दूध पाजत आहे. त्या पिल्लावर स्वतःचेच असल्याप्रमाणे प्रेम करत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा आणि प्रियंका शुक्ला यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत प्रेमळ हसू येईल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चिंपाझी दुधाच्या बाटलीमधून सिंहाच्या पिल्लाला दूध पाजत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो युजर्सनी या व्हिडीओला पाहिले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment