बॉलिवूडच्या मस्तानीचे इन्स्टाग्रामवर झाले ५ कोटी फॉलोअर्स


आपल्या निखळ हास्य आणि दमदार अभिनय शैली यांच्या जोरावर बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेकांची मने जिंकल्यामुळे दीपिका आज अनेकांचे क्रश असल्याचे पाहायला मिळते. केवळ देशातच नाही, तर विदेशातही लोकप्रियतेच्या शिखरावर असेलल्या या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असल्यामुळेच दीपिका या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रीय असते. विशेष म्हणजे दीपिकाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.

काही वेळापूर्वीच दीपिकाने इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत तिचे ५ कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्याची माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर चाहत्यांचे तिने आभारही मानले आहेत. तसेच तिने तिच्या फॅन क्लबचेही आभार मानले आहेत. दरम्यान, दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लॉकडाउनमुळे रखडले आहे. पण दीपिका या काळातही घरी राहून तिच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यात वेळ घालवत आहे.

Leave a Comment