लॉकडाऊनमध्ये आयुष्मान खुराणाने खरेदी केला एवढ्या कोटींचा अलिशान बंगला

अभिनेता आयुष्मान खुराणा लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट दिल्यानंतर चंडीगड येथील आपल्या घरी पोहचला आहे. त्याने आपले होमटाऊन पंचकुलामध्ये अलिशान बंगला खरेदी केल्याचे देखील सांगितले जात आहे. संपुर्ण कुटुंब एकत्र राहू शकेल, यासाठी आयुष्मानने हे घर खरेदी केले आहे.

आयएनएससोबत बोलताना आयुष्मान म्हणाला की, खुरानाजने नवीन फॅमिली होम खरेदी केले आहे. संपुर्ण कुटुंबाने हे नवीन घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. येथे संपुर्ण कुटुंब एकत्र राहू शकेल.

Image Credited – navbharattimes

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, 6 जुलैला आयुष्मान आपल्या पत्नीसह तहसीलदार कार्यालयात पोहचला होता. आयुष्मानने हा अलिशान बंगला पंचकुलाच्या सेक्टर 6 मध्ये खरेदी केला असून, या घराची किंमत तब्बल 9 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर काही दिवसांपुर्वीच आयुष्मानचा गुलाबो सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसला होता.

Leave a Comment