OMG ! येथे आहे जगातील पहिले वहिले सोन्याचे हॉटेल

जगात असे अनेक हॉटेल्स आहेत जे आपल्या विचित्र बनावटीसाठी ओळखले जातात. एका अशाच हॉटेलचे व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये उद्घाटन झाले आहे. येथील प्रत्येक वस्तूवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला आहे. या हॉटेलमधील दरवाजे, खिडक्या, फर्निचर, नळ, वॉशरूमसह प्रत्येक गोष्टीत सोने वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमधील जेवणाची भांडी देखील सोन्याची आहेत.

Image Credited – Amarujala

व्हिएतनामची राजधानी हनोई येथील या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक आहे. 25 मजली या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. या हॉटेलच्या बाहेरील भिंतीवर देखील 54000 वर्ग फूटात गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत. हॉटेलच्या लॉबीमधील फर्नीचर आणि सजावटींच्या वस्तूंवर सोन्याने नकाक्षी करण्यात आलेली आहे.

Image Credited – Amarujala

सोन्याने बनलेल्या या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड देखील लाल आणि सोनेरी आहे. वॉशरूममधील बाथटब, सिंक, शॉवरसह सर्वच वस्तू सोन्याच्या बनलेल्या आहेत.

Image Credited – Amarujala

या हॉटेलच्या छतावर एक इन्फिनिटी पूल देखील बनविण्यात आलेला आहे. या पूलाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आलेल्या विटांना सोन्याचा मुलामा चढवण्यात आलेला आहे. या हॉटेलची निर्मिती 2009 साली सुरू झाली होती. या हॉटेलचे सुरूवाती भाडे जवळपास 20 हजार रुपये आहे. तर डबल बेडरूम सुइटमध्ये एका रात्रीसाठी 75 हजार रुपये खर्च येतो. या हॉटेलमध्ये एकूण 6 प्रकारचे रूम्स आणि सुइट आहेत. प्रेसिडेंशियल सुइटच्या एका रात्रीचे भाडे 4.85 लाख रुपये आहे.

Leave a Comment