चीनविरोधात भारताच्या मदतीला अमेरिकन लष्कर


नवी दिल्ली : चीनविरोधात भारताचा कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला तर भारताच्या पाठिशी अमेरिकन लष्कर ठामपणे उभे राहील, असे व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. अमेरिकेन नौदलाने आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन लढाऊ विमाने तैनात केली असून त्याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आले आहे.

आमचा संदेश स्पष्ट आहे. चीन किंवा इतर कोणालाही सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावशाली होण्यासाठी आम्ही फक्त दर्शक म्हणून उभे राहत हाती कमान देणार नाही. मग तो कोणताही भूभाग किंवा प्रदेश असो, असे फॉक्स न्यूजशी बोलताना व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पूर्व लडाखच्या अनेक भागात आठ आठवड्यांपासून तणाव कायम आहे. सोमवारी चिनी सैन्य काही प्रमाणात मागे सरकल्याची माहिती देखील पुढे आली आहे. रविवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी फोनवर चर्चा केली. त्यांनी ज्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून (एलएसी) सैन्याची माघार मान्य केली. मेडोज यांनी म्हटले की, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दोन विमानवाहक जहाज पाठवले आहेत.

ते म्हणाले की, जगातील सर्वोत्तम शक्ती आमच्याकडे आहे हे जगाला ठाऊक असेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्रात प्रादेशिक वादांमध्ये चीनचा सहभाग आहे. जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन दावा करतो. या भागावर व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांचाही दावा आहे.

Leave a Comment