परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची अमेरिकेची घोषणा


वॉशिंग्टन – कोरोना महामारीमुळे शिक्षण व्हिसावर अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएनने दिले आहे.

ऑनलाइन शिक्षणास अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने सुरुवात केली असेल तर अशा विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार आहे अन्यथा त्यांना हद्दपार केले जाईल, असा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही.

उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या हजारो-लाखो विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या या निर्णयामुळे फटका बसणार आहे. होमलँड सेक्युरिटी विभागाच्या आकडेवारीनुसार, ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे सध्याच्या घडीला शिक्षण व्हिसा आहे. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर अनुक्रमे भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

ऑनलाइन क्लासेस ज्या विद्यार्थ्यांचे सुरु झाले आहेत त्यांच्याकडे अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी कोणतेच कारण नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सर्व विद्यापीठ आणि कॉलेजना सर्व कोर्सेस ऑनलाइन सुरु कऱण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात पाठवण्यासाठी योजना आखली आहे. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Leave a Comment