केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी क्वारंटाईन, कोरोनाग्रस्त आमदाराच्या आले होते संपर्कात

केंद्रीय मंत्री आणि ओडिशाच्या बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांनी नवी दिल्ली येथील घरी स्वतःला सेल्फ-आयसोलेट केले आहे. राज्यातील एका भाजप आमदाराला कोरोनाची व्हायरस झाल्याचे समजताच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सारंगी त्या आमदारासोबत दोन कार्यक्रमात सहभागी झाले होते. आता त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री सारंगी यांनी ट्विट करत माहिती दिली की, 2 आणि 3 जुलै रोजी दोन कार्यक्रमात बालासोर जिल्ह्यातील नीलागिरीचे आमदार सुकांत कुमार नायक यांच्यासोबत सहभागी झाले होते. नायक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार स्वतःला दिल्लीतील घरी क्वारंटाईन केले आहे.

नायक यांना सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झालेले ते ओडिशाचे पहिले आमदार आहेत. नायक हे माजी आमदार मदन मोहन दत्ता यांच्या अंत्य संस्कारात सहभागी झाले होते. यावेळी सांरगी देखील उपस्थित होते.

Leave a Comment