आता हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडणार टीक-टॉक


नवी दिल्ली – आता लवकरच हाँगकाँगच्या मार्केटमधून शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म ‘टीक-टॉक’ बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे संकेत सोमवारी उशीरा कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिले आहेत.

टीक-टॉकच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था रॉयटर्ससोबत बोलताना टीक-टॉक येत्या काही दिवसांमध्ये हॉंगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडेल, असे सांगितले. फेसबुकसह अन्य टेक्नॉलॉजी कंपन्याही त्यांचे काम बंद करत असल्याची माहिती यावेळी प्रवक्त्याने दिली. आम्ही हाँगकाँगमधून टीक-टॉक अॅपचे काम थांबवण्याचा निर्णय नुकत्याच घडलेल्या काही घडामोडींमुळे घेतल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.

खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर हाँगकाँगमधून काढता पाय घेण्याचा निर्णय चीनच्या बाइट डान्स कंपनीची मालकी असलेल्या टीक-टॉकने घेतला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांनंतर टीक-टॉकने हा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेमध्ये मंजूर झाल्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment