हवेच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे कोणतेही पुरावे नाही


लंडन : जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे, त्यातच या जीवघेण्या रोगावर कोणतेही औषध अद्याप तरी आलेले नाही. अनेक देशात कोरोना प्रतिबंधक औषध शोधण्यावर अहोरात्र संशोधन सुरु आहे. दरम्यान कालच 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा करत जागतिक आरोग्य संघटनेने सुधारित नियम जारी करण्याची मागणी केली होती. यावर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नसल्याचे आहे.

हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी दिली आहे. 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नसल्यामुळे मास्क वापरणे आणि एकमेकांपासून १ मीटरचे अंतर ठेवणे कायम ठेवावे, असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सी.एस.आय.आर.चे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment