कोरोना संकटात रणदीप हुड्डाची समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

अभिनेता रणदीप हुड्डा आपल्या चित्रपटातील अभिनयासोबतच सामाजिक कार्यासाठी देखील ओळखला जातो. नुकतेच त्याने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला होता. रणदीपने याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तो मास्क घालून समुद्र किनाऱ्यावर सफाई करताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करत रणदीपने सांगितले की, समुद्र किनाऱ्यावरून 16 टन कचरा काढण्यात आला. कचऱ्यात सर्वाधिक प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक होते.

रणदीपने लिहिले की, जेव्हा पर्यावरणातील घाण आणि शोषण मी पाहिले त्यावेळी मलाही इतरांप्रमाणे हे दुसऱ्याचे काम आहे असे वाटले. मात्र सत्य हे आहे की आपण सर्व पृथ्वीचे प्राण असून, यात आपण सर्व सोबत आहोत. त्यामुळे ही माझी देखील जबाबदारी बनते.

रणदीपने पुढे लिहिले की, मी अफरोज शाह यांच्याप्रमाणे जमिनीवर उतरून स्वतः बदल घडवणाऱ्यांपासून प्रेरित होऊन आपल्या आजुबाजूला जे माझ्याच्याने शक्य आहे ते करत आहे. तुम्ही करत आहात का ?

Leave a Comment