आता ‘टीक-टॉक’ प्रमाणेच ‘चिंगारी’द्वारे करु शकणार कमाई


नवी दिल्ली – भारत सरकारने टीक-टॉक 59 चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारतीय स्मार्टफोन युझर्स सध्या स्वदेशी अॅप्सला पसंती देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच टीक-टॉकची जागा आता भारतीय अॅप चिंगारीने घेतली असल्यामुळे कंपनीकडून आपल्या अॅपमधील फीचर्स देखील अपडेट करत आहे. त्याचबरोबर टीक-टॉकप्रमाणेच शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म चिंगारी अॅपवर आता क्रिएटर्स आपल्या टँलेंटला शोकेज करुन चांगली कमाई करू शकतात. अॅप डेव्हलपर्सनी म्हटले की, गाण्याची रिच आणि हिट्सच्या आधारे ते म्यूजिक क्रिएटर्सला मानधन देतील. त्याचबरोबर म्यूजिक कंपोजर्सच्या हिट गाण्यांसाठी चिंगारी रेव्हेन्यू शेअरिंगदेखील करेल.

यासंदर्भात कंपनीचे को-फाउंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुमित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंगारी कंटेंट क्रिएटर्ससाठी आधीच एक हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. हे पाहता, आम्ही हा प्लॅटफॉर्म म्युजिक कंपोजर्सलाही देत आहोत. चांगल्या म्यूजिक कंपोजर्सना 16 मिलियन यूजर्सपर्यंत चिंगारी चांगल्या पद्धतीने पोहचवण्याचा प्रयत्न करील. आपल्या देशातील कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे. लवकरच आम्ही डांस आणि इतर टॅलेंटद्वारे क्रिएटर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन कमाई करण्याची संधी उपलब्ध करुन देऊ, असे म्हटले आहे.

चिंगारी वापरकर्त्यांच्या वेगाने वाढणाऱ्या मागण्या पाहून आम्ही सतत अॅपला अपडेट करत आहोत. अशा परिस्थितीत कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याचबरोबर कंपनीत सध्या 25 कर्मचारी आहेत, पण जुलै अखेरपर्यंत 100 कर्मचारी केले जातील. चिंगारी अॅपला अनेक कंपन्यांकडून आर्थिक मदत आणि गुंतवणुकदारांच्या ऑफर आल्याचे सुमित घोष यांनी म्हटले आहे.

आपल्या व्हिडिओसाठी चिंगारी यूजर्सला पॉइंट्स (प्रती व्ह्यू) मिळतात. याला नंतर पैशात रिडीम केले जाते. समाचार फीड फॅशनमध्ये व्हिडिओ अपलोड करणे आणि कंटेंट सर्चशिवाय यूजर्स नवीन लोकांसोबत ओळख करू शकतात. यासोबतच अॅप ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, लव कोट्स आणि इतर अनेक गोष्टी देतो. चिंगारी अॅपचा इंटरफेस टिक टॉकसारखा असून यात अनेक सुधारणांची गरज आहे. या अॅपमध्ये इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड़, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलगु भाषेचा सपोर्ट आहे. हे अॅप अँड्रायड आणि आयओएस यूजर्ससाठी मोफत उपलब्ध आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment