प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरला जात आहे ‘बांबूचा टिफिन’, नेटकऱ्यांनी केले कौतुक

प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून बाजारात तांबे, माती आणि बांबूच्या बनलेल्या बाटल्यांची विक्री केली जात आहे. लोक यांची मोठ्या प्रमाणात खरेदी देखील करतात. आता प्लास्टिक डब्ब्याला पर्याय म्हणून बांबू पासून बनलेला टिफिन देखील बाजारात आला आहे.

आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये व्यक्ती बांबूद्वारे बनवलेल्या टिफिनची माहिती देत आहे. हा टिफिन केवळ पर्यावरणच नाही तर आरोग्यासाठी देखील चांगला आहे. सुधा रमन यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यात झोगम बांबूद्वारे बनविण्यात आलेला बांबूचा टिफिन कॅरियर बघा. स्थानिक संसाधनांचा वापर करून सुंदर व कामाची वस्तू बनवली आहे. नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. हे केवळ आकर्षकच नाही तर इको फ्रेंडली आणि अनेकांच्या पोटा पाण्याचा देखील मार्ग आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले असून, नेटकरी या इको फ्रेंडली टिफिन कॅरियरचे कौतुक करत आहे. अनेकांना याचे डिझाईन देखील आवडले.

Leave a Comment