महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसानिमित्त केदारचे खास पत्र


पुणे : आज भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल अर्थात महेंद्र सिंह धोनीचा 39 वा वाढदिवस आहे. 7 जुलै 1981 रोजी झारखंडच्या (तेव्हा बिहार) रांचीमध्ये त्याचा जन्म झाला होता. धोनीवर आज क्रिकेटपटूंपासून चाहते वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यातच बर्थ डे गिफ्ट म्हणून धोनीला भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने खास पत्र लिहिले आहे. केदार जाधवने आपल्या पत्रात क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवतानाच आयुष्य कसे जगायचे हेही तुम्ही शिकवल्याचे म्हटले आहे. हे पत्र त्याने ट्विटरवर शेअर केले आहे.


केदार आणि धोनी यांच्यात चांगलाच याराना आहे. वेळोवेळी धोनीचे केदार जाधवने कौतुक केले आहे आणि त्याचे आभारही मानले आहेत. त्यामुळेच आज केदारने धोनीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. या पत्राद्वारे केदारने त्याची क्रिकेट कारकीर्द घडताना धोनीने दिलेली शिकवण आणि धोनीसोबतचे नाते कसे तयार झाले आणि कसे घट्ट होत गेले याबाबतचा उल्लेख देखील केला आहे.

Leave a Comment