HBD Dhoni : जाणून घ्या ‘हेलिकॉप्टर’ शॉटविषयी खास गोष्टी

महेंद्रसिंग धोनीच्या नावावर क्रिकेटमधील अनेक कीर्तिमान आणि विक्रमांची नोंद आहे. मात्र मैदानावर त्याच्याद्वारे खेळला जाणार एक शॉट संपुर्ण जगात प्रसिद्ध आणि चर्चित आहे. याचे नाव आहे हेलिकॉप्टर शॉट. एक असा शॉट ज्याचा शोध स्वतः धोनीने लावला. आजही त्याच्या बॅटमधून निघणारा हा शॉट चाहत्यांना तेवढाच आवडतो.

Image Credited – cricketaddictor

हेलिकॉप्टर शॉटचा इतिहास –

असे सांगितले जाते की धोनीने हा शॉट आपला लहानपणीचा मित्र आणि झारखंडचा माजी खेळाडू संतोष लालकडून शिकला होता. धोनीने सुरुवातीला मित्राकडून हा शॉट शिकला व नंतर मोठ्या स्तरावर याचा  वापर करण्यास सुरूवात केली. धोनीच्या या मित्राचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला.

धोनीच्या आधी सचिनने खेळला होता हा शॉट –

भलेही हेलिकॉप्टर शॉट धोनीमुळे लोकप्रिय झाला असला तर धोनीच्या सचिन तेंडुलकरने देखील एका सामन्यात हा शॉट मारला होता. सचिनने 2002 मध्ये इग्लंड विरुद्धच्या सामन्यात हा शॉट खेळला होता.

Image Credited – NDTV

आंतरराष्ट्रीय स्तरावर –

धोनीचा हा शॉट सर्वात प्रथम 2006 साली गोव्यात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाहण्यास मिळाला होता. यावेळी इयान बॉथमने देखील धोनीच्या शॉटचे कौतुक केले होते.

हेलिकॉप्टर नाव कसे मिळाले ?

2011 मध्ये आलेल्या पेप्सीच्या एका जाहिरातीमध्ये धोनी एका व्यक्तीला चारा कापणारी मशीन चालवताना शिकवत आहे. यानंतर ती व्यक्ती धोनीला म्हणते की, खूपच भारी, आता तेथेही जाऊन असेच कर.

Image Credited – amarujala

ताकद आणि तंत्राचा समन्वय –

या शॉटसाठी प्रामुख्याने ताकद आणि संतुलनाचा गरज आहे. धोनी हा शॉट खेळण्यासाठी संपुर्ण ताकद लावताना दिसून येतो. यावेळी त्याची बॅट मागच्या बाजूला फिरते व बॉल खालील बाजूला धडकतो. धोनी पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये ताकद वापरलेली असते. हा शॉट खेळताना मात्र ताकदसोबत एकाग्रता आणि तंत्रज्ञानाची अधिक गरज असते.

Leave a Comment