मुंबई पोलिसांच्या धोनीला वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा


मुंबई – मागील चार महिन्यापासून कोरोनाच्या धसक्यामुळे भारतीय संघाचे खेळाडू घरात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे. दरम्यान उद्यापासून इंग्लंड-वेस्टइंडिज क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पण सुमारे १० महिन्यांपासून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्यातच आज त्याचा वाढदिवस असल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीने आज ४०व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे त्याच्यावर धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


धोनीला आजी माजी क्रिकेटपटू, क्रिकेट जाणकार, क्रीडापटू आणि IPL मधील संघ साऱ्यांकडून शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. त्यात धोनीला मुंबई पोलिसांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा विशेष भाव खाऊन गेल्या आहेत. ट्विटरवर एक फोटो त्यांनी पोस्ट केला. त्या फोटोवर MSD लिहिले. तसेच पाहायला गेले तर MSD म्हणजे महेंद्रसिंह धोनी असे म्हटले जाईल. पण या कोरोनाच्या संकट काळात पोलिसांनी त्याच्या नावातील अद्याक्षरांतून एक नवा फुल फॉर्म शोधून काढला. पोलिसांनी MSD शब्दाचा फुल फॉर्म maintain social distance असा लिहिला. तसेच फोटोत देखील स्टंपवरील बेल्स अशा प्रकारे ठेवल्या की त्याला घराचा आकार येईल आणि साऱ्यांना घरात सुखरूप राहण्याचा संदेशही दिला.

Leave a Comment