गुगलने युजर्ससाठी आणले नवीन सोशल मीडिया अ‍ॅप

गुगलने आपल्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म गुगल+ ला रिलाँच केले आहे. गुगल प्लसला कंपनीने आता नवीन स्वरूपात गुगल करंट्स म्हणून लाँच केले आहे. गुगल करंट्स हे गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपला अ‍ॅपस्टोरवर उपलब्ध आहे. मात्र सध्या याचा वापर केवळ एंटरप्राइज कस्टमर्सच करू शकतात. सर्व युजर्ससाठी हे अ‍ॅप कधी उपलब्ध होणार याची अद्याप गुगलने अधिकृत माहिती दिलेली नाही.

प्ले स्टोरवर गुगलने या अ‍ॅपबाबत सांगितले आहे की, या अ‍ॅपद्वारे युजरला आपल्या सहकाऱ्याशी कनेक्ट राहता येईल, डॉक्येमेंट्स पाठवता येतील, संस्थेची/ऑफिसची इतर माहिती युजर्सला मिळेल. गुगल प्लस बंद झाल्यानंतर आता हे अ‍ॅप युजर्ससाठी चांगला पर्याय ठरू शकते.

हे अ‍ॅप सध्या केवळ जी सूट्स युजर्ससाठी उपलब्ध आहे. 9टू5 गुगलच्या रिपोर्टनुसार गुगल प्लसचे जुने यूआरएल आता देखील सुरू राहतील व याचा उपयोग केल्यास थेट गुगल करंट्सवर रिडायरेक्ट केले जाईल. दरम्यान, गुगलने 2018 साली गुगल+ अ‍ॅप बंद केले होते.

Leave a Comment