धक्कादायक : 2,500 रुपयात मिळत आहे कोरोनाचा बनावट नेगेटिव्ह रिपोर्ट

आज छोट्यातील छोटे काम करण्यासाठी पैशांची लाच द्यावी लागते. कोणतेही सर्टिफिकेट अथवा महत्त्वाचे कागदपत्र हवे असल्यास लाच द्यावी लागते ही वस्तूस्थिती आहे. अनेक कठोर कायदे, जागृकता असे असले तरी भ्रष्टाचार थांबताना दिसत नाही. मात्र लाच देण्याचा जुगाड कधीकधी महागात पडू शकतो. कोरोना व्हायरस महामारीत देखील भ्रष्टाचार होताना दिसत आहे.

सध्या बाहेर जाण्यासाठी किंवा इतर अनेक कामांसाठी हॉस्पिटलचे कोरोना नेगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक आहे. मात्र काही डॉक्टर या संधीचा उपयोग पैसे कमविण्यासाठी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एक हॉस्पिटल 2,500 रुपयांमध्ये कोरोनाचे बनावट नेगेटिव्ह सर्टिफिकेट वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, 2,500 रुपयांमध्ये कोरोनाचे नेगेटिव्ह सर्टिफिकेट बनवून देईल. एक आठवडा हे सर्टिफिकेट मान्य असेल. कोठेही हे सर्टिफिकेट दाखवता येईल.

ही घटना समोर आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे व हॉस्पिटलला सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment