या हत्तीणीच्या हटके हेअरस्टाईलची सोशल मीडियावर तुफान चर्चा, फोटो व्हायरल

तामिळनाडूमधील एका हत्तीणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या हत्तीणीची हेअरस्टाईल याची खास गोष्ट आहे. लोकांना या हत्तीणीची हेअरस्टाईल खूपच आवडत आहे. सेंगामालम हत्तीण मन्नारगुडी शहरातील राजगोपालास्वामी मंदिरात राहते. या हत्तीणीचे कापलेले केस चर्चेचा विषय ठरत आहे.

या हत्तीणीचा फोटो आयएफएस अधिकारी सुधा रामने यांनी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, तिला बॉब-कट सेंगामालम म्हणून ओळखले जाते. आपल्या हेअरस्टाईलमुळे तिचे खूप चाहते आहेत.

2003 मध्ये या हत्तीणीला केरळच्या राजगोपालास्वामी मंदिरात आणण्यात आले होते. या हत्तीणीची विशेष काळजी घ्यावी लागते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांना देखील हत्तीणीची हेअरस्टाईल खूप आवडली.

संगामलमच्या केसांना उन्हाळ्यात दिवसातून तीनदा व अन्य वेळी एकदा तरी धुतले जाते. उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी 45 हजार रुपयांचा एक विशेष शॉवर देखील लावण्यात आलेला आहे.

Leave a Comment