दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण


पुणे : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गडद होत आहे. त्यातच आता राज्यातील राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना देखील कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः राहुल कुल यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली आहे.

दरम्‍यान, आमदार राहुल कुल यांच्या कुटुबियांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यात सर्व कुटुंबियांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे. आमदार राहुल कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना तपासणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचा संदेश त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे.

Leave a Comment