नव्या नियमांसह 118 दिवसांनंतर उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार


नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात लॉकडाऊन बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार ११८ दिवसांनंतर इंग्लंडच्या साऊथम्पटन येथे नव्या नियमांसह पुन्हा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचा संघ ८ जुलै रोजी पहिल्या कसोटीत आमनेसामने ठेपणार आहेत. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मैदानात प्रेक्षक हजर नसतील. याबाबत माहिती देताना इव्हेंट संचालक स्टीव्ह एलवर्दी म्हणाले, आता चौकार व षटकार मारल्यानंतर सीमारेषेच्या बाहेरील चेंडू राखीव खेळाडू ग्लोव्हज घालून घेऊन येतील. गोलंदाज लाळेचा वापर करू शकणार नाही. अतिरिक्त खेळाडू कोरोना पर्याय म्हणून उपलब्ध असतील.

मैदानात ५० ते ७० ठिकाणी स्वयंचलित हँड सॅनिटायझर मशीन्स बसवल्या आहेत. त्यांचे बटण दाबण्याची गरज नाही. पॅव्हेलियनचे सर्व दरवाजे उघडे ठेवले जाणार आहेत. खोलीतील एसीचे तापमान मानकांनुसार निश्चित केले आहे. ड्रेसिंग रूमच्या बाजूला दोन चौरस मीटरची एक स्वतंत्र जागा तयार केली आहे, ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल.

या नियम आणि अटींनुसार होणार क्रिकेटचा सामना

  • नव्या नियमांनुसार रेफरी आणि कर्णधार नाणेफेकच्या वेळी उपस्थित असतील. त्यावेळी ग्राउंड स्टाफ किंवा टीव्ही कॅमेरामन यांना परवानगी नसेल.
  • नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करू शकणार नाही.
  • अंपायर स्वत: बेल्स घेऊन जातील. ब्रेकदरम्यान स्टम्प्स सॅनिटाइझ केले जातील.
  • मैदानातील कर्मचारी आणि टीव्ही कॅमेरामन खेळाडूंपासून २० मीटर लांब उभे असतील.
  • मैदानात उपस्थित सर्व कर्मचारी चिप कार्डसह सज्ज असतील. कारण त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर ते कोणाच्या संपर्कात होते याचा शोध घेणे सोपे जाईल.
  • बॉलवर लाळ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन इशाऱ्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघास ५ अतिरिक्त धावा मिळतील.
  • पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडू संक्रमण मुक्त करण्याची जबाबदारी पंचांची असेल.
  • खेळाडूंना हॉटेलमध्ये असे अॅप दिले जाईल, ज्याद्वारे दरवाजे आपोआप उघडतील.
  • कोरोनामुळे पहिल्यांदा कसोटी सामन्यात पर्यायी खेळाडूला मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment