कोरोना : भारतात बनणार स्वस्त रेमडेसिविर, एवढी असेल किंमत - Majha Paper

कोरोना : भारतात बनणार स्वस्त रेमडेसिविर, एवढी असेल किंमत

कोरोनावर सर्वाधिक प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविरच्या किंमत आणि पुरवठ्यावरून मागील काही दिवसांपासून तक्रार सुरू होती. मात्र आता स्वस्त रेमडेसिविरचे उत्पादन भारतातच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. औषध कंपनी मायलान एनव्हीने (Mylan NV) सांगितले की गिलियड सायन्सेजचे कोरोना व्हायरसवरील अँटीव्हायरल औषध रेमडेसिविरचे जेनरिक व्हर्जन भारतात लाँच केले जाणार आहे. कंपनीनुसार याची किंमत 4,800 रुपये असेल. ही किंमत विकसित देशांच्या तुलनेत 80 टक्के कमी आहे.

कॅलिफोर्निया येथील गिलियडने 127 विकासशील देशांमध्ये रेमडेसिविर औषध उपलब्ध करण्यासाठी अनेक जेनेरिक औषध निर्मात्यांसोबत करार केला आहे. मायलान आधी सिप्ला लिमिटेड आणि हेटेरो लॅब्स लिमिटेडने मागील महिन्यात या औषधाचे जेनरिक व्हर्जन लाँच केले आहे.

सिप्ला आपले व्हर्जन सिप्रेमला 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत देईल. तर हेटेरो रेमडेसिविरच्या आपल्या जेनेरिक व्हर्जनची 5400 रुपयांमध्ये विक्री करत आहे. मायलानची किंमत 100 एमजी कुपीसाठी निश्चित करण्यात आली आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी किती कुपीचा कोर्स पुर्ण करावा लागेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

क्लिनिकल ट्रायलमध्ये रेमडेसिविरऔषधाने कोरोना रुग्णांचा बरे रिकव्हरीची वेळ कमी झाल्याने या औषधाच्या मागणीत वाढ झाली आहे. मायलान कंपनीने म्हटले की, भारतात रेमडेसिव्हिर औषध इंजेक्टेबल सामग्री अंतर्गत बनवले जाईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मायलानच्या रेमडेसिविर व्हर्जनला डेसरेम नाव दिले आहे.

Leave a Comment