कोरोना : धुमधडक्यात काढली वरात, भरावा लागला 50 हजारांचा दंड

कोरोना व्हायरसमुळे लग्न-समारंभात मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. असे असले तरी काहीजण धुमधडक्यात शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न करत आहेत. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात गंजाम जिल्ह्यात असेच एक लग्न पार पडले. यावेळी लग्ना दरम्यान कोणीही मास्क घातला नव्हता व सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने वर-वधू दोन्ही कडील कुटुंबाना 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने दोन्ही कुटुंबाविरोधात पोलीसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी वरात ज्या कारमधून काढली होती त्या कारला देखील जप्त केले आहे. गंजाम ओडिशातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा आहे. त्यामुळे येथे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

वरातीचा डान्स करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की लोक विना मास्क, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत वरतीचा आनंद घेत आहेत.

Leave a Comment