सुशांतच्या मृत्यूनंतर रडकुंडीला आला करण जोहर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर चर्चा सुरू झाली आहे. युजर्स स्टार किड्ससोबत करण जोहरवर देखील टीका करत आहेत. नेपोटिझमवरून या आधी देखील करण जोहरवर टीका झाली आहे. मात्र सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर युजर्स त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येने करणला मोठा धक्का बसला आहे. ट्रोलिंगमुळे त्याला त्रास होत असून, तो सतत रडत असतो, असा खुलासा त्याच्या जवळील मित्राने केला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या करणने सुशांतच्या मृत्यूनंतर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार करण जोहरच्या खास मित्राने त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, करण जोहरला मोठा धक्का बसला असून, ट्रोलिंगमुळे त्याला अधिक फरक पडत नसे, मात्र सुशांतच्या निधनानंतर मोठा परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगने त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम केला आहे.

करणच्या मित्राने सांगितले की, त्याच्या संबधित लोक त्याच्यावर टीका करत असल्याने तो अधिक चिंतेत आहे. त्याच्या मुलांना मारण्याची धमकी येत आहे. करण आता बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. तो लढणे विसरला आहे. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो रडू लागतो. तो रडत रडत विचारतो की मी असे काय केले, ज्यामुळे मला हे सहन करावे लागत आहे.

Leave a Comment