सध्या फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरतात, तर मुख्यमंत्री मातोश्री बाहेरच पडत नाही - Majha Paper

सध्या फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरतात, तर मुख्यमंत्री मातोश्री बाहेरच पडत नाही


पुणे: मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

कोरोनाच्या संकट काळात विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायलाच तयार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर यावेळी त्यांनी बोट ठेवले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, रोज कुठे ना कुठे फडणवीस फिरत आहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेरच पडायला तयार नाही.

ते आतापर्यंत केवळ दोनवेळा मातोश्रीवरुन बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुण्यातील हातावर पोट असलेल्या लोकांना एका महिन्यासाठी नोकरी देणार असल्याचे आजच्या पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. तसेच यापुढील काळात लॉकडाऊन झेपणार नसल्याचे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment