मागील 2 महिन्यात सायबर घटनांमध्ये 200% वाढ – पीएमओ अधिकारी

भारतात मागील दोन महिन्यात सायबर घटनांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सुचना सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे घरून काम करण्यासाठी सेवा क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे या घटना वाढल्या आहेत. लोक ज्यामध्ये सुरक्षेचा अभाव आहे असे कोणतेही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करत आहेत. सायबर घटनांमध्ये झालेल्या चीनला जबाबदार धरण्यासाठी मात्र कोणतेही पुरावे नाहीत, असे ते म्हणाले.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, राय म्हणाले की, हे सत्य आहे की मागील दोन महिन्यात सायबर घटना, जसे की हॅकिंग सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ 200 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र या गोष्टीचे कोणतेही पुरावे नाहीत की भारत-चीनमधील तणावामुळे हे हल्ले झाले आहेत.

त्यांनी सांगितले की, विशेष एजेंसी या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत व हे हल्ले रोखत देखील आहे. फिशिंग, सेवा संबंधी आणि रॅनसमवेअरचे अनेक प्रकरण समोर आली आहेत. ही प्रकरण केवळ दोन्ही देशातील तणावामुळे वाढलेले नाहीत. तर जानेवारी, फेब्रुवारीच्या अखेरपासून घरून काम केल्याने वाढले आहेत.

राय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत हे आवाहन महत्त्वाचे आहे. अमेरिका आणि यूरोपियन देश देखील चीनवरील आत्मनिर्भरता कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment