येथे तयार झाले देशातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर, 10,100 बेडची क्षमता

देशभरात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी बेड कमी पडू नये यासाठी मोठ्या स्तरावर कार्य सुरू आहे. आता कर्नाटक सरकारने बंगळुरूमध्ये बंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये (बीआयईसी) 10,100 बेडची क्षमता असलेले कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. राज्य सरकारचा दावा आहे की हे देशातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर आहे.

ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसतील असा नागरिकांना या सेंटरमध्ये ठेवले जाईल. या सेंटरमध्ये सर्व रुग्णांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी देखील राहण्याची सुविधा आहे.

Image Credited – scoopwhoop

10,100 बेड असणाऱ्या या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजन व इतर आवश्यक सेवांची उपलब्धता करण्यात आली आहे. येथे बाथरूम, शौचालय या सर्व गोष्टी देखील आहेत. येथे जवळपास 150 रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे. बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त बी. एच. अनिल कुमार आणि येथील आमदार एस. आर. विश्वनाथ यांनी काही दिवसांपुर्वीच या केअर सेंटरची पाहणी करत आढावा घेतला होता.

Loading RSS Feed

Leave a Comment