Bigg Bossच्या 14 व्या पर्वासाठी सलमानने वाढवले मानधन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. पण आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात उद्योगधंदे सुरु झाले आहेत. पण या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका टिव्हीच्या दुनियेला बसला होता. आता त्यावर मात करत मालिकांच्या त्याचबरोबर चित्रपटांच्या चित्रिकरणाला अटी आणि नियमांनुसार सुरुवात झाली आहे.

त्यातच छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रियालिटी शोच्या 14 व्या पर्वाची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान या सिझनमध्ये कोण कोणते स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये हा शो सुरू होणार असल्याची चर्चा आहे. सलमानच या सिझनचे सूत्रसंचालन करणार आहे.

‘बिग बॉस 14’ साठी नेहमीप्रमाणे सलमाने आपल्या मानधनात वाढ केली असून तो आता एका एपिसोडसाठी 16 कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे माहिती समोर येत आहे. ‘बिग बॉस १३’ वेळी असे म्हटले जात होते की प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास १३ कोटी रुपये सलमानला देण्यात आले होते. त्यानुसार सलमानने १३ व्या सीझनसाठी जवळपास २०० कोटींची कमाई केली. या शोच्या प्रत्येक पर्वात सलमानच्या मानधनात वाढ होत असते. ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनसाठी त्याने एका एपिसोडसाठी ११ कोटींचे मानधन घेतल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment