छगन भुजबळ यांच्याकडून अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर पडदा


नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः अभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यावरुन निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला असून यावर स्पष्टीकरण देताना भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास मी सांगितले होते. चौकशीत मुंबई पोलिसांनी अक्षय कुमारला परवानगी दिली होती. त्यामुळेच त्याचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आल्याचे म्हटले आहे.

दरम्यान अभिनेता अक्षय कुमारचा नाशिकचा खासगी दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हेलिकॉप्टरची परवानगी अक्षय कुमारला कशी मिळाली? तसेच, त्याला ग्रामीण भागात शहरी पोलिसांचे संरक्षण का? याप्रकरणी छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच गाडीतून मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री फिरत असताना, अभितेना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली?, असा सवाल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

अक्षय कुमारला नियम डावलून व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा? असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment