मोदींच्या अचानक दौऱ्यानंतर चिनी ड्रॅगनची घाबरगुंडी; 1.5 किमी मागे जाणार सैनिक


लडाख : भारत आणि चीनमध्ये मे महिन्यापासून सुरु असलेल्या वादानंतर ज्या ठिकाणी 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, त्या ठिकाणापासून आता चीन दीड किमी आपले सैनिक मागे घेणार आहे. गलवान, हॉटस्पिंग गोग्रा या भागातून लष्कर मागे घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चीनी सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर गलवान खौऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी अंतरावरून मागे हटले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानांतरणाबाबत दोन्ही देशांच्या सैन्याने सहमती दर्शविली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. आता एक बफर झोन गलवान खौऱ्याजवळ बनवण्यात आला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 जुलै रोजी झालेल्या अचानक लेह-लडाख भेटीने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. पंतप्रधानांची ही भेट भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची मानली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही थागपत्ता लागू न देता 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर पोहोचले. मोदींनी यावेळी सुमारे 25 मिनिटे जवानांशी संवाद साधला होता. त्यामध्ये एवढ्या उंचीवर, टोकाच्या नैसर्गिक परिस्थितीत देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यांनी पाठ थोपटली. तुम्ही या अवघड परिस्थितीत आपल्या मायभूमीची ढाल असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Leave a Comment