अक्षय कुमार शेअर केला आगामी 'बेल बॉटम'च्या स्टारकास्टसह फोटो - Majha Paper

अक्षय कुमार शेअर केला आगामी ‘बेल बॉटम’च्या स्टारकास्टसह फोटो


अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांसह आपल्या सामाजिक कार्यामुळे देखील चर्चेत असतो. आता अक्षय आपल्या आगामी बेल बॉटम चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट चित्रीकरणाआधीच बराच चर्चेत असून आज ट्विटरवर या चित्रपटाचे हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मिडियावर आपल्या या चित्रपटातील स्टारकास्टसह फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यात लाँच करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.


रंजित तिवारी हे बेल बॉटमचे दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेत्री वाणी कपूरने काही दिवसांपूर्वी आपण अक्षय कुमारसह काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अक्षयने आज या चित्रपटातील स्टारकास्टसह फोटो शेअर केला आहे. या फोटोत लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरेशी, निर्माता जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक रंजित तिवारी दिसत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात होणार असून जे युनायटेड किंग्डमला होणार आहे.

Leave a Comment